vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अमरावतीत 19 मे रोजी ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा..

अमरावतीत 19 मे रोजी ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा..

अमरावती, प्रतिनिधी: सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 19 मे 2026 रोजी ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये नागपूर आणि अमरावती येथील नामांकित कंपन्या प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टॅलेन्टकॉर्प सोल्यूशन प्रा.लि. नागपूर, जाधव गियर्स लि. अमरावती, जिनस इन्फ्रास्ट्रक्चर लि. अमरावती आणि प्रेसिजन मॅपिंग जी.आय.एस. प्रा.लि. अमरावती या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी त्या-त्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील आणि पात्र उमेदवारांची जागेवरच नोकरीसाठी निवड केली जाईल

अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 मे रोजी स्वखर्चाने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोंसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. याकरिता उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.

मेळाव्याबाबत काही अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयाच्या 0721-2566066, 8983419799 किंवा 8605654025 या क्रमांकावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील गरजू आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि पंजाबमधील पूरपरिस्थितीला भारतीय हवाई दलाने दिला झटपट प्रतिसाद

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित