vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावेत. कामाला प्रशासकीय मान्यता झाल्यास कामाचे कार्यारंभ आदेश द्यावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मधील प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांच्या याद्या लवकरात लवकर घ्याव्यात, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विशेषत: सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण व जलसंधारण विभागाने त्यांच्याकडील कामांच्या प्रशासकीय मान्यता तात्काळ घेऊन कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. जिल्हा परिषदेकडील ग्रामीण भागातील कामांच्या देखभाल दुरुस्तीचे ना हरकत प्रमाणपत्र गटविकास अधिकाऱ्यांकडून घ्यावे, त्यांच्या कामांनाही मान्यता द्यावी.

जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपालिकांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची तसेच विशेष घटक योजनेंतर्गत कामांची यादी द्यावी. 15 ऑगस्ट नंतर प्रत्येक कामाला सुरुवात झाली पाहिजे. प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मागे पडू नये. ज्या विभागांना खर्चाचे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता जिल्हा वार्षिक योजनेतील कामे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. हे लक्षात घेता सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. या प्रस्तांवाना तातडीने मान्यता देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आरोग्य भवन येथे आढावा बैठक

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटनयेणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन