vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

        सांगली, प्रतिनिधी) : खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील युवक-युवती, महिला व पुरुषांकरिता निःशुल्क उ‌द्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसाठी नोंदणी सुरू आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

     महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था (AMRUT) महाराष्ट्र शासन अंतर्गत स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्र (MCED) महाराष्ट्र शासनाच्या उ‌द्योग संचालनालयाअंतर्गत स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून उद्योजकता विकास, निवासी उद्योजकता विकास, तांत्रिक उद्योजकता विकास व क्षमतेचा विकास या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरु आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उ‌द्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

    उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme -21 दिवस) – विविध व्यवसाय संधी मार्गदर्शन, प्रकल्प निवडीची प‌द्धतशीर प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, सरकारी योजनेची माहिती, यशस्वी उ‌द्योजकांचे अनुभव कथन, अमृतच्या विविध योजना इत्यादी.     निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Residiential Entrepreneurship Development Programme -18 दिवस) – EDP प्रमाणेच सर्व विषय निवासी सुविधासह प्रशिक्षण.       तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Technical Entrepreneurship Development Programme-30 दिवस) – पुढीलपैकी कोणत्याही दोन व्यवसायावर तांत्रिक प्रशिक्षण – सोलर दुरूस्ती आणि देखभाल प्रशिक्षण, बेकरी प्रशिक्षण, निर्यात-आयात प्रशिक्षण, अॅडव्हान्स ब्युटी पार्लर व मेकअप प्रशिक्षण, सीसीटीव्ही बसवणे व देखभाल प्रशिक्षण, संगणक, DTP प्रशिक्षण, गृह उद्योग प्रशिक्षण, केटरिंग सेवा, स्नॅक्स सेंटर, रेस्टॉरंट, इव्हेंट व्यवस्थापन, मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, भाजीपाला डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण, ई-सेवा व मल्टी-ऑनलाईन सेवा प्रशिक्षण, अन्न व फळ प्रक्रिया प्रशिक्षण, दुग्धजन्य प्रोडक्ट उत्पादन प्रशिक्षण, मसाले उत्पादन प्रशिक्षण, हस्तकला प्रशिक्षण, सायबर सुरक्षा प्रशिक्षण, अॅनिमेशन व ग्राफिक्स प्रशिक्षण, ऑटोकॅड प्रशिक्षण, हायड्रोपोनिक भाजीपाला उत्पादन, बांबू उत्पादने व वस्तू प्रशिक्षण, लेदर वस्तू प्रशिक्षण, ज्वेलरी प्रशिक्षण, काजू प्रक्रिया प्रशिक्षण, प्रिंटींग व रिवर्स इंजिनियरिंग प्रशिक्षण, फोटोशॉप प्रशिक्षण इत्यादी.   क्षमतेचा विकास प्रशिक्षण (Capacity Building Programme- 6 दिवसीय) – जेम (GeM Portal), डिजिटल मार्केटिंग, निर्यात व्यवस्थापन, ई-टेंडरिंग, वित्तीय व्यवस्थापन, पॅकेजिंग ब्रँडिंग व लेबलिंग इत्यादी, (प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र तसेच शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून विशेष प्रयत्न).

00000

संबंधित पोस्ट

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट*स्थलांतरीत मजूरांच्या पाल्यांच्या संगोपन उपक्रमाची पाहणी,बालकांचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी- आयुष्मान खुराणा…

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

vishwatmaklokswamivarta

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta