vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेकरिता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ….

वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेकरिता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ….

 

        सांगली, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु झालेली आहेत. सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थिनी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरु करण्यात आलेली असून या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रियेकरिता दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण,सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

       इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेण्याऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगीक सर्व कागदपत्रे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुना बुधगांव रोड,सांगली या कार्यालयास दि. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमा करावीत.

       अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधिक्षक मोबा. क्र.9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधिक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

निराधार मुलांच्या आधार नोंदणीसाठी ‘साथी’चा आधार,एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे