vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..

नंदुरबार, प्रतिनिधी: शिवस्वराज्य निमित्त कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

जिल्हा परिषदेत पार पडलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्राला सेठी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) पांडूरंग कोल्हे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, माध्यमिकचे प्रवीण अहिरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, अभिजित मोरे, रविंद्र पावर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.ढोलताशांच्या गजरात अत्यंत उत्साही वातावरणात शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी श्रॉफ हायस्कूल (नंदुरबार) च्या संगीत पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. तसेच डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या लेकी या उपक्रमांतर्गत योगासनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महारांजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करून उपस्थितांची मने जिंकली.

सुत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कलाशिक्षक चंद्रशेखर चौधरी, हेमंत पाटील, समग्र शिक्षा अभियानाच्या मनीषा पवार, विद्या थोरात, रत्ना विसपुते, शितल भदाणे दिनेश कढरे, संजय पाटील, ज्ञानेश्वर बोरसे, महेंद्र अहिरे, प्रवीण पवार, इस्राईल सैय्यद, डॉ. गिरीश पवार, योगेश रघुवंशी, मयुर वाणी, स्वप्नील पाटील यांनी सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे अभिवादन-जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानंतर कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शिवस्वराज्य दिना निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या परिसरातील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

♦️मुंबईत मानखुर्द येथे तीन मजली चाळीतली दोन-तीन घरं कोसळून सहाजणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर.

विनानंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक #कारवाई,हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड ; चालक-मालकांना कडक इशारा#रेती, #मुरुम, मातीची #वाहतूक विनानंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही- वनमंत्री गणेश नाईक