vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्धतेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश  

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्धतेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

 

     नवी मुंबई प्रतिनिधी     प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याचे लाभ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 5 महापालिका रूग्णालये आणि 29 खाजगी रूग्णालयांमध्ये मिळत असून यामध्ये नागरिकांना येणा-या अडचणी दूर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वाशी किंवा नेरूळ रूग्णालयात मदत कक्ष सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.

           त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डचे वितरण नागरिकांना जलद होण्यासाठी जिल्हास्तरावरून कार्ड उपलब्ध होण्याची वाट न पाहता महानगरपालिकेच्या वतीने कार्ड बनवून ते वितरणाची कार्यवाही करावी, जेणेकरून नागरिकांना या योजनांचा जलद लाभ घेता येईल अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

           नमुंमपा आरोग्य विभागाच्या आढावा बैठका नियमित होत असून 7 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत विविध बाबींचा आढावा घेताना आयुक्तांमार्फत हे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.दमयंती घाडगे व डॉ.रत्नप्रभा चव्हाण, सर्व रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, माता बाल रूग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे वैद्यकीय अधिकारी आणि नमुंमपा पीजी मेडिकल संस्थेचे डीन डॉ. ज्ञानेश बेलेकर आणि उपस्थित होते.

           नमुंमपा क्षेत्रातील प्रत्येक क्षयरोगी महानगरपालिकेस समजावा यादृष्टीने क्षयरोगाची औषधे घेणा-या रूग्णांची माहिती सर्व औषध विक्रेते यांचेकडून संकलित करण्याची कार्यप्रणाली राबवावी व त्याकरिता त्यांची बैठक घ्यावी तसेच याकामी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मदत घ्यावी असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

           सध्या पावसाळी कालावधीतील डासांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक मोहीमांना अधिक गती द्यावी असे सूचित करतानाच डासउत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने जास्तीत जास्त जनजागृती करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

          गणेशोत्सव कालावधीत नागरिक जास्तीत जास्त ठिकाणी भेटी देतात तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांच्या ठिकाणीही जातात हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने पुरविल्या जाणा-या सेवासुविधांची माहिती देणारे फलक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करावेत असे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले.

           राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) कार्यक्रमातील एनसीडी (NCD – Non-Communicable Diseases) अभियान अंतर्गत करण्यात येणा-या 30 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला गतिमानता देण्याचे निर्देश देण्यात आले. या तपासणीव्दारे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Cancer – स्तन, गर्भाशय, मुख), हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान होऊन त्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने त्यामध्ये अचूकता असावी असेही सूचित करण्यात आले.

            यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील मृत्यूदराचा सविस्तर आढावा घेताना डेथ ऑडिट अधिक काटेकोरपणे योग्य रितीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसेच कारणमिमांसा करून त्यानुसार उपचारपध्दतीत सुधारणा करण्यात यावी आणि त्याचा भविष्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी उपयोग करून घ्यावा असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.

          महापालिका सर्वसाधारण सभेने एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण मंजूर केले असून त्या धोरणातील बाबींचा सर्वांनी अभ्यास करावा व त्यामधील बाबींविषयी आपले अभिप्राय द्यावेत असेही आयुक्तांनी सूचित केले.

नवी मुंबई महागरपालिका रूग्णालयातील दुर्घटना टाळण्यासाठी उच्च अधिका-यांपासून ते कर्मचा-यांपर्यंत प्रत्येकाने दक्षतेने काम करावे. प्रत्येक स्तरावरील कार्यवाहीची आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी व त्यानुसार काम करावे. रूग्णालय व्यवस्थापन प्रक्रियेत कोणतीही त्रूटी राहणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी असे निर्देशित करतानाच कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.

संबंधित पोस्ट

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

शिरूर तालुक्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कारवाई; मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम- डॉ. संतोष बोराडे

अकोले, कोपरगाव, संगमनेर येथील रुग्णालयांचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन ; राज्य शासनाची मान्यता,जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta