vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

 

    अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टेनिस बॉल क्रिकेट सामने-2026’ (वर्ष 8 वे) मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघाने विजय मिळविला. अमरावती येथील छत्रीतलाव मैदानावर नुकतीच ही स्पर्धा पार पडली.

  या स्पर्धेत आरोग्य विभागातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा अंतिम सामना जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती आणि अचलपूर महिला व बाल रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे राज डुलगज याने मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला. सुशील ओसवाल यांना उत्कृष्ट गोलंदाज, तर अभिजीत निचत यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सेमी फायनलमध्ये डॉ. मनिष गोतमारे आणि दुसऱ्या सेमी फायनलमध्ये स्वप्निल उसरे सामनावीर ठरले.

    पुरस्कार वितरण सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. रणजीत राठोड, डॉ. विक्रांत कुळमेथे, अनंतराव पारसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रमोद निरवणे यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, आरोग्य सेवेतील ताणतणाव दूर करण्यासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. निलेश पाचबुद्धे, विशाल पवार आणि आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. राठोड यांनी आभार प्रदर्शन करून स्पर्धेची सांगता केली.

00000000

संबंधित पोस्ट

रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन

मासोदमध्ये आरोग्य स्थिती नियंत्रणात

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

कर्करोग तपासणी आणि जनजागृती शिबिर संपन्नबदलापूरमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन