vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

 

        अमरावती, प्रतिनिधी शहरातील महत्वाचे असलेले अंबादेवी आणि एकविरादेवी संस्थानचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही संस्थानच्या विकासासाठी एकत्रित आराखडा राबवावा लागणार आहे. यासाठी सर्व जमिनीवरील नियोजन करून एकत्रित स्वरूपात कामांचे नियोजन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.     जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री रूख्मिणी विदर्भपीठ कौंडण्यपूर आणि अंबादेवी, एकविरादेवी संस्थानच्या विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, अंबादेवी आणि एकविरादेवी ही शहराच्या मध्यवस्तीत असून जुन्या वस्तीमध्ये आहेत. भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने याठिकाणी सुविधा उभारणे आवश्यक आहे. प्रामुख्याने मंदिराजवळ असलेले अरूंद रस्ते मोठे करणे गरजेचे आहे. तसेच भाविकांसाठी वाहनतळाची सुविधा उभारावी लागणार आहे. या मंदिरांमध्ये नवरात्री उत्सवाच्या कालावधीत गर्दी होते. गर्दीच्या वेळी सुविधा वाढविणे गरजेचे असते, यावर विश्वस्त मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. विकास आराखडा राबविताना टप्पेनिहाय राबवावा. यासोबतच विकासकामे करताना बांधकाम क्षेत्र वाढविण्याची शक्यता असल्यास महिला बचतगटांना विविध मालाच्या उत्पादनासाठी इमारत देण्यात यावी.

   कौंडण्यपूर येथे तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासासाठी निधी देण्यात आला आहे. यातून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. संस्थानकडून कौशल्य विकास, तसेच इतर उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून गरजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी इमारत बांधकाम आणि इतर सोयी सुविधांसाठी निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्यानुषंगाने आवश्यक जमिन हस्तांतरणासाठी संस्थानने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न**साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन

ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा* *विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना–राज्यपाल जिष्णुदेव वर्मा*

vishwatmaklokswamivarta

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ