जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित
जालना, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार आणि लेखनकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटर, जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा विषय “विज्ञान शिक्षण आणि मी” असा असून, मराठी,हिंदी किंवा इंग्रजी पैकी कोणत्याही एका भाषेत विद्यार्थ्यांनी A4 आकाराच्या कागदावर चार पानांचा निबंध स्वच्छ हस्ताक्षरात लिहून पाठवायचा आहे. ऑनलाइन निबंध पाठविणाऱ्यांनीही हस्तलिखित निबंधाचा स्पष्ट स्कॅन किंवा छायाचित्र पाठवावे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क ₹५० आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक – मायक्रोस्कोप, द्वितीय पारितोषिक – टेलिस्कोप मेकिंग किट, तृतीय पारितोषिक – पेरिस्कोप मेकिंग किट देण्यात येणार असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
निबंध पाठविण्याची अंतिम दिनाक 20 ऑगस्ट २०२६ असून, पारितोषिक वितरण समारंभ ५ सप्टेंबर २०२६ रोजी जालना येथे आयोजित करण्यात येणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले निबंध टिकारीया सायन्स हॉबी सेंटर, सदर बाजार पोलीस स्टेशन रोड, बालाजी गल्ली, जालना – ४३१२०३ या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :मो. 80872 73772 / 87881 64274विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विज्ञानाविषयीचे आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.