vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- येथील धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने जिल्हा कारागृहातील बंदीजनांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. बंदीजनांच्या विविध आरोग्य चाचण्यांसाठी लागणारे वैद्यकीय उपकरणे शनिवार दि.१९ रोजी सकाळी १० वा. जिल्हा कारागृहाला दान करण्यात येणार आहे. यानिमित्त बंदीजनांसाठी कर्करोग निदान शिबिरही आयोजीत करण्यात आले आहे.

 मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे हा कार्यक्रम होणार असून खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.धर्मादाय सह आयुक्त नितीन जाधव, धर्मादाय उपायुक्त उषा चव्हाण-पाटील, सहा. धर्मादाय आयुक्त प्रभू कापडे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत वरुडीकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महात्मा गांधी मिशन रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, एम.आय.टी. रुग्णालय, एम.एम.आर.आय. कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद चिकलठाणा लायन्स आय हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, बी.एस.पी. मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, इंडीयन मेडीकल असोसिएशन या संस्थांनी या उपक्रमात सहयोग दिला आहे. हृदयरोग तपासणी, कर्करोग निदान, कान नाक घसा आणि डोळे तपासणी, महिलां करीता कॅन्सर विस्हयक पॅप स्मीअर तपासणी, मूळव्याध, त्वचारोग तपासणी, डोळ्यांकरीता मोतीबिंदू तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी,सी.पी.आर. प्रात्यक्षीक आणि प्रशिक्षण आदी कार्यक्रम व उपक्रम यावेळी होणार आहेत.

००००००

संबंधित पोस्ट

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात मोफत आयुष निदान व उपचार शिबिर संपन्न

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

जन आरोग्य योजना सर्वांसाठीच ठरणार जीवनदायी

vishwatmaklokswamivarta

लेख-हिवताप दूरीकरण हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे

गोटपॉक्स लसीकरण : पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख लसमात्रांचे वाटप सुरू मोहीम गतिमान करण्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील 

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

vishwatmaklokswamivarta