vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘महाआयडी’ तयार करता येणार कागदपत्रविरहित प्रक्रिया; अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘महाआयडी’ तयार करता येणार

कागदपत्रविरहित प्रक्रिया; अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार

            मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी २.० (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या प्रणालीवर आधार क्रमांकाद्वारे महाआयडी तयार करून मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध २४ योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ केला. त्यामुळे या योजनांसाठी आता महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज करता येणार आहेत

  मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, शाश्वत आर्थिक समृद्धी साधणे, मत्स्यशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि विशेषतः लहान शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ९ मार्च २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’ला मान्यता दिली. या अंतर्गत भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायासाठी सहा राज्यस्तरीय, १९ जिल्हास्तरीय आणि तीन जिल्हास्तरीय योजनांमधील सुधारणा अशा एकूण २८ योजनांचा समावेश आहे

  यापैकी चार राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि दोन जिल्हास्तरीय योजनांमधील सुधारणा अशा एकूण २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी योजनांची ‘गव्हर्नमेंट प्रोसेस री-इंजिनिअरिंग’ (जीपीआर) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

            या प्रक्रियेमुळे नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही कागदपत्रे ऑफलाइन सादर करावी लागणार नाहीत. विविध ऑनलाइन डेटाबेसचे एकत्रीकरण करून आवश्यक माहिती स्वयंचलितरीत्या उपलब्ध केली जाईल. पडताळणीचे टप्पे आणि आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी झाल्याने लाभार्थ्यांना जलद सेवा मिळेल. प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध होतील आणि योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ऑनलाइन जमा केले जाईल.

 

 

 

        मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या मासेमारी परवाना वितरण सेवेसाठीही जीपीआर तयार करण्यात आला आहे. योजनांचे सुलभीकरण, अनावश्यक प्रक्रिया कमी करणे, डिजिटल सेवा उपलब्ध करणे आणि मत्स्यव्यवसायातील उत्पादकता व लाभार्थी सेवांचा विस्तार करणे हा या सुधारणांचा उद्देश आहे

     महाआयडी तयार करताना किंवा योजनांसाठी अर्ज करताना अडचण आल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधता येईल. महाडीबीटी २.० प्रणालीसंबंधी मदतीसाठी आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्षाशी कार्यालयीन वेळेत ०२२-३५२१०५६१ किंवा ०२२-३५१५४०४५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

००००

 

 

 

संबंधित पोस्ट

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना”ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधारसांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया;पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण

खेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू- मंत्री जयकुमार गोरे

घरोघरी जाऊन बीएलओ मार्फत मतदार माहिती संकलन कामाला वेग – ऑनलाईन गणनापत्र भरण्याचीही सुविधा