vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू- मंत्री जयकुमार गोरे

खेड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू- मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी सरपंचांविरोधात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, २८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आलेल्या तपासणीत ग्रामपंचायतीतील काही विकासकामांमध्ये अनियमितता आढळून आली. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी २ मार्च २०२३ रोजी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. यानंतर विकासकामांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी उपअभियंत्यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने ५ मे २०२३ रोजी सादर केलेल्या अहवालात खेड ग्रामपंचायतीत १२ कामे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया न करता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच सरपंचांविरोधात ग्रामपंचायत कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून याची पहिली सुनावणी झाली आहे. या प्रकरणाचा निर्णय नियोजित मुदतीत घेण्यासाठी विभागीय आयुक्तांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल असे मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

झिरो माईल’ विकास प्रकल्पाला केंद्राची साथ;*समन्वयासाठी दोन अधिकारी नियुक्त**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश*

vishwatmaklokswamivarta

कोविडबाबत नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष – रूग्णालयांत राखीव बेड्स नियोजन नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेण्याचे व वैयक्तिक स्वच्छता बाळगण्याचे आवाहन

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाबत महत्त्वाची माहिती 🌸

vishwatmaklokswamivarta