vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्वच्छताकार्यातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रशिक्षणवर्ग

स्वच्छताकार्यातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रशिक्षणवर्ग

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्त डॉ.कैलास शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली ठिकठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमांप्रमाणेच क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

          या अनुषंगाने आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांमधील (SHGs) महिलांना उपजिविका आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात एक ठिकाणी अशा 8 ठिकाणी झालेल्या या प्रशिक्षण वर्गाचा लाभ महिला बचत गटातील 385 महिलांनी घेतला.

          यामध्ये केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालविणे, थ्री आर केंद्र चालविणे, ई – कचरा केंद्र चालविणे, जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करणे व पुनर्निर्मिती करणे, प्लास्टिक कच-याचा पुनर्वापर करणे, फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे आणि सेंद्रिय खत निर्मिती व बायोगॅस प्रकल्प या विषयांवर रोजागाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले.

          घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महिला बचत गटांमधील महिलांची क्षमता बांधणी करण्यासाठी कौशल्य मल्टिक्रिएशन्स या संस्थेच्या सहकार्याने 8 ठिकाणी आयोजित या मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि समाजविकास विभाग यांनी सहयोगाने केले. महिला बचत गट (SHGs) व अशासकीय संस्था (NGOs) प्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी समाजविकास विभागातील समुह संघटक यांनी सहकार्य केले तसेच दुर्गा फांऊडेशन यांनीही आयोजन सहकार्य केले.

          स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 च्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात योगदान देण्यासोबतच महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी देणा-या या क्षमता वर्धक उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार-अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक-स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी-स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे- आ. प्रशांत बंब

vishwatmaklokswamivarta

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धतेची प्रतिज्ञा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta