vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

मुंबई, दि. २९ : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी. डी. एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देश परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिले.

 

राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात याबाबत बैठक पार पडली. येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचे व प्रगतीचे सादरीकरण केले. जिंतूर तालुक्यातील अवर्षणप्रवण तसेच सिंचनाच्या अल्प सोयी असलेल्या भागातील शेतकऱ्यांची बंद पाईपलाईनद्वारे (पी. डी. एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. येलदरी धरणातून उपसा करून जिंतूर तालुक्यातील केहाळ, सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, चारठाणा, भोसी यांसारख्या अनेक गावांना सिंचनाचा लाभ मिळणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने व्यापक जनहिताचा हा प्रश्न सोडवीण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्याचे निर्देश राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी दिले.

 

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यावेळी म्हणाल्या, जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. बदलती पीक पद्धती, या पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी पुरवठा आणि संबंधित सर्व मुद्द्यांचा अभ्यास प्राधान्याने करावा. व्यापक शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.0000

 

संबंधित पोस्ट

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर येथे दिनांक 8 डिसेंबरपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आलासंविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार..

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आगामी सण, उत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत-महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे