vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

 

सातारा प्रतिनिधी- : जागतिक महिला दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी ‘महिला सन्मान बाईक रॅली २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका-महानगरपालिका तसेच विविध महामंडळांमध्ये कार्यरत सुमारे १००० महिला अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.

ही भव्य बाईक रॅली सकाळी ९.०० वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून सुरू होणार असून विविध प्रमुख मार्गांवरून प्रवास करत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे पोहोचणार आहे. रॅलीचा मार्ग गांधी मैदान-राजवाडा येथून सुरू होऊन राजपथ रोड, पोवई नाका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, पारंगे चौक, प्रशासकीय इमारत, सिव्हील हॉस्पिटल, बांधकाम भवन असा असेल.

रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात येणार आहे. ही रॅली सकाळी ९.०० ते १०.१५ या वेळेत पार पडेल.

यानंतर सकाळी १०.१५ ते ११.०० या वेळेत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाबाबत १० मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांच्या जिल्हा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून या कार्यक्रमासाठी सर्व विभागांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होणार असून महिलांच्या सशक्तीकरणाचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

जिल्ह्यातील विविध विभागांतील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या बाईक रॅलीत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु 

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप-हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य राबविले जात आहे

लखनऊच्या CCS आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIने १५.४६ कोटींचं हाय-ग्रेड हायड्रोपोनिक गांजा (१५.४६ किलो) जप्त  बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून व्हॅक्युम-पॅकिंगमध्ये लपवलेला गांजा सापडला. पुढील तपास सुरू आहे.