vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी- दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीने सक्षम (अव्यंग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये १ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये २ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. अर्थसहाय्याची रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त खात्यात DBT प्रणालीद्वारे हस्तांतरीत होणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : जोडप्यातील किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावी. दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र असावे. संबंधित व्यक्तींचा हा प्रथम विवाह असावा. घट स्फोटीत असल्यास अशी मदत यापुर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र. विवाह नोंदणी दाखला. पती व पत्नीचा आधार संलग्न बँक खात्याचा सविस्तर तपशील. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. इच्छुक अर्जदारांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अर्ज करावेत. सदर योजनेचा लाभ दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी व त्यानंतर विवाह झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

नृत्यांगना गौतमी पाटीलवर मरगळे कुटुंबीयांचा गंभीर आरोप, कारने रिक्षाला धडक दिल्यानंतर चौकशी तर सोडाच पण…

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

vishwatmaklokswamivarta

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज!