vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राज्य प्रतिनिधी बीड, : बीड नगरपरिषदेच्या हद्दीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून निश्चित केलेले महत्वकांक्षी विकासकामे, प्रकल्प योग्य नियोजन करुन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बीड नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, दिवंगत अजितदादा पवार यांनी बीड शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता बीड नगरपरिषदेच्या हद्दीत महत्वकांक्षी विकास कामे आणि प्रकल्प निश्चित केले होते. ती सर्व विकास कामे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने योग्य नियोजन करुन कार्यवाही करावी.

शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेचे नियोजन करुन, दैनंदिन घनकचरा संकलन व वाहतूकीसाठी १५ व्या वित्त आयोगातून नियोजन करावे सदर कामासाठी शासनस्तरावर कोणतीही परवानगी किंवा निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबत कळवावे.

शहरातील विकासकामांना गती देण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित सुविधा योग्य पणे राबविण्यात याव्यात. तसेच नगरपरिषदेत रिक्त असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ..       

vishwatmaklokswamivarta

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण