vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश

मनरेगाचा प्रलंबित निधी आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन,रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याला यश..

मुंबई, द प्रतिनिधी– महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) 2014 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पासवान यांनी येत्या आठ दिवसांत राज्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्रासमोरील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक विकासकामांसाठीच्या प्रलंबित निधीकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या प्रलंबित निधीबाबत केंद्र शासन आवश्यक ती कार्यवाही करेल तसेच येत्या आठ दिवसांत राज्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी दिले.

या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, रोजगार हमी विभागाचे सहसचिव अतुल कोदे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहसचिव रोहिणी भाजीभाकरे तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील मनरेगा अंतर्गत प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, निधी उपलब्ध झाल्यानंतर विभागातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 20 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

विशेष सखोल पुनरीक्षण; निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी दावे हरकतींसाठी १२ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील काही भागात गुरूवारपासून पाणी नाही

vishwatmaklokswamivarta

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचेवीज बिल शून्यावर आणणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडेपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सौरऊर्जा प्रकल्पासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार,पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर प्रायोगिक सौरऊर्जा प्रकल्पआयुक्त कार्यालयातील इमारतींची छते आणि साकूड येथील प्रक्षेत्राचा पहिल्या टप्प्यात समावेश..

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील