vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – मंत्री भरत गोगावले

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – मंत्री भरत गोगावले

मुंबई, प्रतिनिधी– राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. या भागातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबागा जगविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य सुरेश धस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये बाधित होणाऱ्या फळबागा जगविण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री गोगावले यांच्याकडे केली. या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री गोगावले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी बाधित झाला आहे. विविध पिकांसोबतच या भागातील फळबागा लागवडीवरील क्षेत्र सुमारे 2.5 लाख हेक्टर एवढे असून पाणी पुरवठ्याअभावी उभी असलेली फळबाग नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील फळबागांना पाणीपुरवठा करणे अथवा त्यासाठी शेतकऱ्यांना व्हीबी जीरामजी योजनेच्या माध्यमातून मदत करणे, अशा उपायोजना करणे गरजेचे आहे. याबाबत मंत्री गोगावले यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारकडून व्हीबी जीरामजी योजनेअंतर्गत 375 कामांकरिता राज्यासाठी 4420 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्या निधीबरोबरच फळबाग बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने मदत करावी, असा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे मंत्री गोगावले यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, सहसचिव कैलास साळुंके, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे, फलोत्पादन संचालक जीवन बुंदे, व्हीबी जीरामजी योजनेच्या आयुक्त अनिता मेश्राम (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे ६१ कोटी ७४ लाख रुपयांचा घोटाळा 

जिल्हास्तरावरच्या न्यायालयांमधे न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय ६० वरुन वाढवून ६२ वर्ष करण्याला आतापर्यंत देशातल्या १४ राज्यांनी मान्यता दिली असल्याबददल सर्वोच्च न्यायालायने समाधान व्यक्त….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार- मंत्री आदिती तटकरे

श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

vishwatmaklokswamivarta