vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन- दुर्गोत्सवासाठी 5 ते 25 नोव्हेंबर कालावधीत ऑनलाईन नोंदणी- गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन- दुर्गोत्सवासाठी 5 ते 25 नोव्हेंबर कालावधीत ऑनलाईन नोंदणी- गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राज्यभरात ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दीपावलीच्या सुट्टीमध्ये गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या पारंपरिक लोकपरंपरेला प्रोत्साहन देणे, दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या इतिहासाची व शौर्यपरंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच संबंधित घटकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या उपलब्ध जागेनुसार घराचे अंगण, बाल्कनी, गृहसंकुलातील सार्वजनिक जागा किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी गड-दुर्गाची प्रतिकृती तयार करावी. प्रतिकृती तयार करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. शाळा व महाविद्यालयांनाही त्यांच्या परिसरात दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून या उपक्रमात सहभागी होता येईल. प्रतिकृती तयार केल्यानंतर सहभागी व्यक्तीने प्रतिकृतीसोबत स्वतःचे छायाचित्र काढून अमृतच्या अधिकृत https://www.amrutdurgotsav.com/ या संकेतस्थळावर नोंदणी अर्जासह अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणी व छायाचित्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल स्वरूपातील ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

        ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ उपक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : दुर्गाची प्रतिकृती तयार करणे व छायाचित्र अपलोड करण्याचा कालावधी 5 नोव्हेंबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2026 असा आहे. नोंदणीच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांची व नोंदणीची पडताळणी करण्यात येईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शक्यतो 24 तासांच्या आत डिजिटल ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येईल. छायाचित्र अपलोड करताना ते स्पष्ट, संबंधित दुर्गाच्या प्रतिकृतीचे असणे आवश्यक आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून घेतलेली छायाचित्रे अपलोड करता येणार नाहीत. हा उपक्रम पूर्णपणे ऐच्छिक असून, सहभागासाठी कोणताही आर्थिक लाभ किंवा पारितोषिक देण्यात येणार नाही.                 याबाबतच्या सविस्तर माहितीसाठhttps://www.amrutdurgotsav.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

00000

 

संबंधित पोस्ट

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक- वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये जागतिक जल दिन उत्साहात साजरा,पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली जलरक्षक शपथ..

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे तीन जण जखमी. सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण