vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

शहापूर | प्रतिनिधी-विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज शहापूर तालुक्यातील पिवळी केंद्रातील ९ शाळांमध्ये मोफत वही वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

या उपक्रमाअंतर्गत खोर, पिवळी, वांद्रे, कोशिंबडे, रताळेपाडा, सावरोली, वेडवहाळ आणि वेहलोंडे येथील जिल्हा परिषद शाळांसह किल्लेमाऊली माध्यमिक शाळेतील एकूण १,०५० विद्यार्थ्यांना सुमारे ३,१०० मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले

यावेळी जिजाऊ संघटना शहापूर तालुका प्रमुख तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, मुंबई म्युनिसिपल बँकेचे संचालक भानुदास भोईर, कुणबी सेनेचे शहापूर तालुका प्रमुख जगन निपुर्ते, जिजाऊ संस्थेचे सुदर्शन पाटील, सुनील निपुर्ते, शिवसेना उपतालुका प्रमुख अमय भाटी, तसेच किशोर धसाडे, विनोद निमसे, यशवंत वाख, आशिष कटारे, रुपेश भोईर आणि जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना दिनेश निमसे म्हणाले, “मा. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ संस्था शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने जनहिताचे उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात वही देणे म्हणजे त्यांच्या भविष्याला बळ देणे होय. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद असून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, यासाठी जिजाऊ संस्था सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिद्दीने अभ्यास करावा आणि अधिकारी बनून समाजाची सेवा करावी.”

 

संबंधित पोस्ट

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजावर अन्याय विरोधात पत्रकार परिषद

vishwatmaklokswamivarta

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन