vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील सार्वजनिक समस्या कडे मनपाचे दुर्लक्ष श्री गणेशाला साकडे

धारावीतील सार्वजनिक समस्या कडे मनपाचे दुर्लक्ष श्री गणेशाला साकडे

मुंबई प्रतिनिधी-धारावीतील खराब व नादुरुस्त रस्ते फुटपाथ वरील अतिक्रमण तसेच नको असलेले कृत्रिम तलाव यामुळे धारावीकर नागरिकांची कोंडी होत आहे

धारावीतील खराब व नादुरुस्त रस्ते फुटपाथ वरील अतिक्रमण तसेच नको असलेले कृत्रिम तलाव यामुळे धारावीकर नागरिकांची कोंडी होत आहे या तक्रारी संदर्भात धारावी नागरिक समितीने ऑगस्ट 26 शेवटच्या आठवड्यात लेखी स्वरूपात धारावीचे रस्त्यांची दुरुस्ती धारावी टी जंक्शन ते कलानगर खाडी येथील फुटपाथ वर नर्सरी व्यापाऱ्याने केलेल्या अतिक्रमण व ेकायदेशीर पाकिंग तसेच एन शिवराजन खेळाच्या मैदानात कृत्रिम तलाव नको अशा आशयाचे पत्र सहाय्यक आयुक्त जी उत्तर उद्यान विभाग व परिरक्षण विभागाला कळविले आहे त्यानंतर ही धारावीतील सर्वच रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल खेळाच्या मैदानाबद्दल आणि प्रथम नागरिक यांना फुटपाथ प्राधान्य या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर 2026 रोजी माननीय आयुक्त महापालिका मुख्यालय महापौर मुख्य कार्यालय तसेच विरोधी पक्ष नेत्या मुख्यालय महापालिका यांच्या कार्यालयांना पुनश्च स्मरण करून लेखी स्वरूपात टपालने पत्र पाठवून देखील याची दखल घेतली गेली नाही किंवा त्यावर उत्तरे मिळालेले नाही यामुळे धारावीकरांच्या समस्येत वाढ झाली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे श्री दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती व अलका साबळे यांनी पालिका प्रशासनाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती बाप्पाकडे या समस्या लवकर सुटतो व पालिका प्रशासन लोकप्रतिनिधी यांना सुबुद्धी देवो असे साकडे श्री गणरायाकडे घातल्याची माहिती दिलीप गाडेकर आणि टीम यांनी दिली

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ…

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम