vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा #पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

राज्य प्रतिनिधी-जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा #पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत दिले.

 पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, महानगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती तसेच दुर्गम व डोंगराळ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आतापासून निश्चित करावेत. या स्रोतांतील पाणीसाठ्याचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार पर्यायी स्रोत तयार ठेवावेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेती, उद्योग, मोठी बांधकामे आणि अन्य पाणीखाऊ वापरांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करावा.

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक आणि परिणामकारक ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडून पाणी प्रत्यक्ष गरजू नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करावी, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि संभाव्य तूट यांचा समावेश असलेला स्वतंत्र चारा कृती आराखडा तयार करावा. चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता, जिल्ह्याची चारा स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त चारा मिळविण्याचे स्रोत निश्चित करावेत. शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून तेथील चारा उपलब्धतेचा अभ्यास करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे — डॉ. भरत बास्टेवाड 

vishwatmaklokswamivarta