vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

 

चिखली : प्रतिनिधी- गेल्या पंचवीस वर्षांपासून बहुजन चळवळीत कार्य करीत अनेक समाज बांधवाना शासन दरबारी न्याय देणारे व आज सर्वांच्या मनात बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले सम्राट संघटना व सम्राट आखाडा चे अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त इतरत्र खर्च न करता निराधार बेघर वयोवृद्धांची सेवा करीत असलेल्या मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकरीता एक महिना पुरेल असे किराणा सामान देऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

आशिष बाबा खरात यांनी देश सेवा करून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेचा वसा हाती घेऊन अनेक गोर गरीब जनतेला शासन दरबारी न्याय देण्याचं काम केले आहे. त्यांना कॅन्सर सारख्या महा बिमारीने ग्रासले असतांना ते एकमेव असे व्यक्तीमत्व आहे कि त्यांनी त्यावर मात करीत आहेत बुद्ध छत्रपती शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने समाज कार्य करीत समाज बांधवाना न्याय देण्याच कार्य करीत असल्यामुळे मी आज जिवंत आहे. या महापुरुषांच्या आशिर्वादामुळे आजपर्यँत मी जीवन संघर्ष करून सुखी समाधानी आहे म्हणून निराधार बेघर लोकांच्या जीवनात थोडं हास्य फुलविण्याच भाग्य व त्यांना तुटकपुंजी मदत व्हावी व वृद्धाच्या उर्वरित जीवनात काहीसा क्षण आनंद जावा या हेतूने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. त्या निराधार वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला अशी प्रतिक्रिया सम्राट संघटना व सम्राट आखाडा चे अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी दिली. यावेळी आशिष बाबा खरात यांनी केलेल्या मदती बद्दल संचालक प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांनी आभार व्यक्त करीत कुठेही निराधार बेघर वयोवृद्ध आढळून आल्यास तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करावे असे आवाहन केले आहे.यावेळी भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवई, प्रा रवीकिरण मोरे, उदय सुरडकर, किशोर सुरडकर यांची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध – रुपाली चाकणकर- जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटाराĺ

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्त संस्थांकडून ऑडिट

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत;२१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

vishwatmaklokswamivarta