vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

 

         नवी मुंबई प्रतिनिधी -सेक्टर 44 ए नेरूळ येथे भूखंड क्र. 5 ते 9 या ठिकाणी आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट या नावाने लॉजिंग अँड बोर्डिंगचा विनापरवानगी व्यवसाय अनधिकृतपणे करण्यात येत होता. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे तसेच परवाना विभागाच्या सहा.आयुक्त श्रीम. शिल्पा देशपांडे व इतर अधिकारी – कर्मचारी यांनी नमुंमपा पोलीस पथकाच्या सहयोगाने त्याठिकाणी धडक कारवाई करीत सदर आस्थापना सीलबंद केली.

  5 जून 2025 रोजी दुपारी 3 ते 7.30 वा. कालावधीत तळमजला ते 23 मजल्यापर्यंतच्या 43 व्यावसायिक रूम्स सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाई दरम्यान सदर आस्थापनेने अनधिकृतपणे लावलेला आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट असा नामफलकही काढून टाकण्यात आला.

   यापूर्वी संबंधित आस्थापनेच्या मालकास 1 एप्रिल 2025 रोजी कलम 376 अन्वये नोटीस देऊन व्यवसाय परवाना घेण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून त्यानुसार संबंधित आस्थापनेच्या मालकाने परवाना विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. तथापि सदरहू इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने संबंधितांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर दि. 20 मे 2025 रोजी सदर आस्थापना बंद करावी अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे संबंधितांस कळविण्यात आले होते. मात्र सदर आस्थापना नोटीस देऊनही सुरू ठेवल्यामुळे आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार सदर आस्थापना मोहोरबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

संबंधित पोस्ट

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

महाराष्ट्र लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारक बैठक

मुंबईकरांसाठी बातमी रविवारी नाही तर आज रात्री असणार मेगा ब्लॉक, NEET विद्यार्थ्यांना दिलासा

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta