vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

 

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.

संबंधित पोस्ट

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

पर्यटकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार