vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

 

बुलढाणा, प्रतिनिधी : एक रकमी परतावा योजनेंतर्गत महामंडळाच्या लाभार्थीना थकीत कर्जाच्या व्याज दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा दि. 31 मार्च 2025 पर्यंत करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचे जिल्हा कार्यालय बुलढाणामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयं रोजगाराकरीता अल्प व्याज दराने कर्ज वितरित केले आहे. परंतु काही लाभार्थ्यांकडून कर्ज थकीत असल्याचे निर्देशनात आले आहे. थकीत कर्ज प्रकरणात कर्ज वसुली व्हावी याकरीता संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तरी या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07262-248285 वर संपर्क करावा.000000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वाचन कट्ट्या’ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी

सोन्याच्या किमतीत सतत वाढ ,आज गाठला उच्चांक दर; वाचा 24 कॅरेटचा भाव

vishwatmaklokswamivarta