vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे बुधवारी (दि.१०)विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळा

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे बुधवारी (दि.१०)विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळा

 

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या वतीने बुधवार दि.१० रोजी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या येथील सदस्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा बुधवार दि.१० रोजी सायं.६ वा. हॉटेल अतिथी, पी-३, जालना रोड, सेव्हन हिल्स, टाऊन सेंटर, छत्रपती संभाजीनगर होणार आहे, असे ट्रायच्या प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरू के. मुरलीधरा यांनी कळविले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ही दूरसंचार व प्रसारण सेवांचे नियमन करण्यासाठी संसदेच्या कायद्याद्वारे 1997 मध्ये स्थापन झालेली वैधानिक संस्था असून, तिने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), संभाजीनगरच्या सदस्यांसाठी विशेष ग्राहक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. हा संयुक्त जनजागृती कार्यशाळा बुधवार, दि.१०रोजी सायं. सहा वा. होणार आहे

ग्राहकांच्या हितांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वैधानिक जबाबदारीचा भाग म्हणून TRAI देशभरात नियमितपणे ग्राहक संपर्क कार्यक्रम (Consumer Outreach Programmes – CoPs) आयोजित करते. या उपक्रमांचा उद्देश दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील बदलत्या घडामोडींविषयी अद्ययावत माहिती देणे, ज्ञानातील दरी भरून काढणे आणि नागरिकांना सक्षम बनविणे हा आहे.

CII परिसंस्थेतील उद्योगपती, व्यावसायिक नेते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची जाणीव ठेवून, TRAI चे प्रादेशिक कार्यालय या उच्चस्तरीय व्यासपीठाद्वारे ग्राहक शिक्षण अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना प्रशिक्षित करून डिजिटल साक्षरता व सुरक्षिततेचे संदेश कर्मचारीवर्ग आणि व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याचा TRAI चा उद्देश आहे

या कार्यशाळेत दूरसंचार हक्क व सुविधा,ग्राहकांचे हक्क, सेवा गुणवत्तेची (QoS) मानके आणि तक्रार निवारण यंत्रणांविषयी सविस्तर मार्गदर्शन. तसेच डिजिटल सुरक्षा व पायाभूत सुविधा, दूरसंचार नेटवर्कचा सुरक्षित वापर करण्यासाठी आवश्यक सूचना तसेच नियामक “करावे आणि करू नयेत” (Do’s & Don’ts) यांची माहिती, सायबर गुन्हे प्रतिबंध या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी के. मुरलीधरा, प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरू यांच्याशी 9449005588 या क्रमांकावर किंवा sro2.bengaluru@trai.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

आंदोलन कोण करायचे हेही सरकार ठरवणार का?राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून निषेधमराठा आरक्षणाच्या मागणीवरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापलेपोलिसांनी नोटीस बजावत आंदोलनाची परवानगी नाकारत बळजबरीने ताब्यात घेतले_

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद