vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला गती ;मेहकर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा : गावपातळीवर आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला गती ;मेहकर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा : गावपातळीवर आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर

बुलढाणा, प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि गावपातळीवरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत मेहकर येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली.

यावेळी अभियानाचे राज्य समन्वयक खंडू सोनटक्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूरज ठाकरे तसेच डॉ. बलकार सर यांनी उपस्थितांना अभियानाची उद्दिष्टे आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर : कार्यशाळेत गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकसहभागातून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून गावागावांत आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आलाअभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत यंत्रणा आणि आशा स्वयंसेविकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेतील मार्गदर्शनातून अधोरेखित करण्यात आले.

या कार्यशाळेला मेहकर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवून नागरिकांचे आरोग्य सुधारावे, यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

शहरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनची व्यापक पावले; नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

गरोदरपणात महिलांच्या एचआयव्ही चाचणीसोबत काविळ चाचणीही प्राधान्याने व्हावी – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

सेवा संकल्प अभियानांतर्गत किशोर मुलीसाठी वयात येताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा