vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला यश दिवाळीसाठी नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला यश दिवाळीसाठी नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन

बुलढाणा, प्रतिनिधी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुकर व्हावा, यासाठी नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे (हडपसर) या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या मागणीला यश आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे दिली आहे.

दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे विभागाने दोन्ही प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या तसेच अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर ८ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, आणखी ८ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे. तर नागपूर-पुणे (हडपसर) मार्गावर १७ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, अतिरिक्त २४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

याशिवाय शेगाव, नाशिक, अमरावती, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि उधना या मार्गांवरही १८ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त आणखी १३ रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पत्रात देण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या आणि अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे पल्स परिषदेतील चर्चासत्रात सहभागी तज्ञांचे मत

ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्राथमिक निवड, मुलाखत, शुध्दिपत्रक, मुलाखत वेळापत्रकाबाबत आवाहन  

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी…