vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन

लातूर, प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशाला हरंगुळ खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हरंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्रशालेत ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ व ‘मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा’ या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, लातूरचे गटशिक्षण अधिकारी चांद शेख, समग्र शिक्षा अभियान प्रमुख सतिष भापकर, शाळेच्या मुख्याध्यापिका राजकन्या गंभीरे, हरंगुळ खुर्दचे सरपंच मनोहर झुंजे पाटील आणि उपमुख्य न्यायरक्षक अ‍ॅड. जी.जे. मिटकरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. गिरवलकर यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम २१अ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असून या वयोगटातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, घटनेतील कलम २३ हे शोषणाविरुद्धच्या हक्काशी संबंधित असून ते माणसांचा व्यापार करण्यास किंवा कोणत्याही व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध सक्तीने काम करण्यास भाग पाडण्यास प्रतिबंध करते, अशी माहिती त्यांनी दिली.

भारतात बालमजुरी रोखण्यासाठी असलेल्या ‘बाल कामगार प्रतिबंध कायदा १९८६’ अंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई असून या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितास कायदेशीर शिक्षा व दंडाची तरतूद असल्याचेही श्री. गिरवलकर यांनी सांगितले. कुठेही बालमजुरी होताना आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ‘चाइल्ड लाईन’च्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शाळेतील एकूण १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

*****

संबंधित पोस्ट

नगर भूमापन कार्यालय मिरज येथे बुधवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रश्नाची दखल;कास्ट्राईब महासंघातर्फे संविधान प्रत देऊन आभार.

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पार्तगळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्ती समारंभाला केले संबोधि

vishwatmaklokswamivarta