vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करा ;फुलोरा अवस्थेतील तूर पिकाचे संरक्षण करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करा ;फुलोरा अवस्थेतील तूर पिकाचे संरक्षण करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

बुलढाणा द प्रतिनिधी: तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, मागील काही आठवड्यांपासून असलेले ढगाळ व कोरडे वातावरण तसेच रात्रीच्या वेळी जाणवणारी थंडी यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या किडीमुळे तूर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.तीन प्रकारच्या किडींपासून तुरीला धोका : तूर पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा), पिसारी पतंग आणि शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. हेलिकोव्हर्पा किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या कळ्या व फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे पोखरून खातात.

पिसारी पतंगाची अळी शेंगांची साल खरवडून छिद्र करते आणि बाहेरूनच दाण्यांचे नुकसान करते. तर शेंगमाशीची अळी शेंगांच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते. त्यामुळे दाण्यांची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम होतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी उपाययोजना : शेतकऱ्यांनी तूर पिकामध्ये हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्या टिपून खाण्यास मदत होते. तसेच घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.

किडींची आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. घाटे अळीचे प्रति सापळा दोन ते तीन दिवसांत ५ ते ६ पतंग आढळणे, प्रति झाड एक अळी किंवा ५ ते १० टक्के नुकसान होणे, ही नियंत्रणासाठी लक्ष देण्याची पातळी आहे. पिसारी पतंगाचे १० झाडांमध्ये ५ पतंग आढळणे, तर शेंगमाशीमुळे ५ ते १० टक्के दाणे नुकसानग्रस्त होणे, हीदेखील कीड व्यवस्थापनासाठी महत्त्वाची स्थिती आहे.पहिली फवारणी : ५० टक्के फुलोऱ्यावर : तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडून फवारणी करावी, असे कृषी विभागाने सुचविले आहे.

• निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम १,००० मिली प्रति एकर.• अझाडिरॅक्टीन १,५०० पीपीएम ५०० मिली प्रति एकर.• एचएनपीव्ही (१०⁹ पीओबी) २०० एल.ई. प्रति एकर.• बॅसिलस थुरिंजिएन्सिस ३०० मिली प्रति एकर.• क्विनॉलफॉस २५ ईसी ४०० मिली प्रति एकर.दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी : किडींचा प्रादुर्भाव व शिफारशींच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करावा.

• इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ६० ग्रॅम प्रति एकर.• लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी २०० मिली प्रति एकर.• इथिऑन ५० टक्के ईसी ५०० मिली प्रति एकर.• क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ६० मिली प्रति एकर.फवारणी करताना घ्यावी काळजी : शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाच्या लेबलवरील सूचना, तूर पिकासाठी असलेली नोंदणी आणि शिफारस केलेली मात्रा तपासावी. एकावेळी एकाच पर्यायाचा वापर करावा. फवारणी करताना वैयक्तिक संरक्षण साधने वापरावीत आणि मधमाश्यांसह उपयुक्त कीटकांचे संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी.

तूर पिकाची नियमित पाहणी, किडींच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि योग्य वेळी शिफारशीनुसार उपाययोजना केल्यास उत्पादनातील संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

पुढील वर्षी 15 लाख बेघरांना घरांच्या चाव्या सुपुर्त करणार येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान• आजपासूनच 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे उत्साहात लोकार्पण…

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण..

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन.

आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस