vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मेळघाटातील अंगणवाडी, पोषण पुनर्वसन केंद्रांना मंत्री तटकरे यांच्या भेटी

मेळघाटातील अंगणवाडी, पोषण पुनर्वसन केंद्रांना मंत्री तटकरे यांच्या भेटी

अमरावती, प्रतिनिधी : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, उपआयुक्त संगीता लोंढे; तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळघाटचा दौरा केला.

दौऱ्यादरम्यान त्यांनी भोकरबर्डी, धुळघाट रोड आणि कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधा, बालकांचे पोषण व आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालक, पालक आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. त्याचबरोबर स्थानिक आदिवासी महिला बचतगटाच्या सदस्यांशीही संवाद साधून त्यांच्या उपक्रमांची माहिती घेत महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितलेधारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्रालाही श्रीमती तटकरे यांनी भेट देऊन तेथील उपचार व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि कुपोषित बालकांच्या उपचारांचा आढावा घेतला. उपचार घेत असलेल्या बालकांच्या मातांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा व पोषण व्यवस्थेची माहिती घेतली.

धारणी तहसील कार्यालयात मेळघाटातील महिला व बालविकास विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना, बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांतील पोषणावर भर, अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा, स्वच्छतागृहे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, गरोदर मातांसाठी दर्जेदार आहार, अंगणवाडी बांधकामांना गती; तसेच महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती ग्रामसभांमार्फत तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

0000

 

संबंधित पोस्ट

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

जिल्हा न्यायालय रायगड व तालुका न्यायालय येथे विशेष मध्यस्थी मोहिमेचे आयोजन