
कल्याण पूर्व येथील तेजस फिटनेस क्लब चा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला
कल्याण प्रतिनिधी-तेजस फिटनेस क्लब च्या संचालिका सौ सुचिता दीपक जाधव यांनी काहीतरी आयुष्यात वेगळं करावं म्हणून फिट इंडिया मिशन अंतर्गत काम करण्यास सुरुवात केली त्यांचे असणारे ऑनलाइन सेशन त्यांनी नीट समजून घेतली नंतर त्या सेशन जॉईन झाल्या पहाटे पाच वाजल्यापासून या ऑनलाइन सेशनला सुरुवात होते तर सौ सुचिता जाधव व दीपक जाधव यांनी ते सेशन जॉईन केले तसेच त्यांनी कमी वेळात सर्व नीट माहिती समजून घेतली आपल्याही विभागात मोफत आरोग्य शिबिर व्हावी असे त्यांना वाटू लागले मग अडवली ढोकळी येथे राहत असल्यामुळे त्यांनी आपल्याच बिल्डिंगच्या टेरेसवर म्हणजे अंजनाबाई प्लाझा आरोग्य शिबिर ठेवले तसेच नाशिक येथील जागतिक वरिष्ठ सल्लागार संदीप खेडकर जागतिक आरोग्य सल्लागार कांतीलाल राठोड हे वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहिले उपस्थित महिलांना नागरिकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच वरिष्ठ सल्लागार श्री संदीप खेडकर यांनी सांगितले लोकांची जीवनशैली घडवण्यात माझा जन्म गेला आहे आज आरोग्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचा कोट्यावधी निधी या आरोग्यासाठी खर्च होतो आरोग्य सल्लागार कांतीलाल राठोड यांनी सांगितले आम्ही लहान मोठे सेमिनार घेतो ऑनलाइन वर्कआउट घेतो आरोग्याच्या समस्या भरपूर आहे कुणाकडे वेळ नाही असेही त्यांनी सांगितले तर फिटनेस क्लब च्या संचालिका सौ सुचिता दीपक जाधव सांगितले की आम्ही सकाळी मॉर्निंग वर्कआउट घेऊन लोकांच्या आरोग्यात कसा बदल करता येईल याकडे आम्ही लक्ष देतो आज तुमच्याकडे किती पैसा असो पण तुमच्याकडे आरोग्य नसेल तर त्या पैशाचा काही एक उपयोग नाही तुमचे आरोग्य चांगले असेल तर जागतिक लेव्हलवर तुम्ही कोणतेही काम करू शकता जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही या जगात काहीच करू शकत नाही आज बरीच हॉस्पिटल खोलले आहेत जर वेळीच आरोग्यावर लक्ष नाही दिले तर भरपूर पैसा खर्च होतो पण हाती काहीच येत नाही असेही सौ सुचिता दीपक जाधव त्यांनी सांगितले की माझे पती दीपक जाधव यांची मला मोलाची साथ असल्यामुळे हे मी काम करू शकते कारण प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा सपोर्ट असल्याशिवाय कोणतही काम होत नाही असेही सौ सुचिता जाधव यांनी सांगितले
तसेच व्यासपीठावर वरिष्ठ आरोग्य सल्लागार संदीप खेडकर आरोग्य सल्लागार कांतीलाल राठोड सौ सुचिता जाधव सौ क्रांती जाधव सौ देवकी खेडकर व्यासपीठावर स्थानपन्न झाले होते
वरिष्ठ सल्लागार संदीप खेडकर यांचा सत्कार श्री दीपक जाधव यांनी केला तर आरोग्य सल्लागार कांतीलाल राठोड यांचा सत्कार पत्रकार मनोहर खेडकर यांनी केला कार्यक्रमास महिलावर्ग उपस्थित होता तसेच उल्हासनगर येथील मुख्य सिविल सर्जन श्री बनसोडे साहेब ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिले चित्रपट अभिनेते डायरेक्टर गौरव विचारे व विठ्ठलवाडी आगारातील कर्मचारी व्यवस्थित होते तसेच श्री किरण जाधव ज्येष्ठ नागरिक श्री श्रवण जाधव तसेच बच्चे कंपनीची मोलाची साथ लागली तेजस फिटनेस क्लबचे चालक-मालक स्वतः तेजस सत्यम कुमारी गायत्री पुष्कर चेतन हे उपस्थित होते तर सर्वांच्या परिचयाचे व मनमिळावू असणारी साईदास दुबळा चव्हाण व मंगेश चव्हाण व जितू चव्हाण यांनी कार्यक्रमास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व महिला कर्मचारी वर्ग नागरिक यांची तेजस फिटनेस क्लब च्या संचालिका सुचिता जाधव यांनी सर्वांच्या आभार मानले कार्यक्रम अतिशय छान उत्तम पार पडला त्याबद्दल त्यांना खूप समाधान व्यक्त केले तर पत्रकार मनोहर खेडकर यांनी तेजस फिटनेस क्लब ने जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय खूप चांगला आहे
कारण आरोग्याच्या समस्या बऱ्याच आहेत जागतिक आरोग्य संघटना बरेच काम करत आहे परंतु त्यांना यश येतच नाही कारण आरोग्य विषयी जागरूक राहणे काळाची गरज आहे खूप महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जण आरोग्य विषयी माहिती देतो पण त्याचा विचार कोणी करत नाही म्हणून तेजस फिटनेस क्लबने अतिशय उत्तम काम करावे त्यासाठी पत्रकार मनोहर खेडकर यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा विशेष म्हणजे कार्यक्रमाचे डेकोरेशन साऊंड माईक अतिशय उत्तम अशी व्यवस्था करणारे सर्वांचे परिचयाचे व लाडके असणारे विशाल मोरे यांची मोलाची मदत झाली त्यांचेही दीपक जाधव यांनी खूप धन्यवाद दिले कार्यक्रम अतिशय चांगला व प्रकारे पार पडला असे दीपक जाधव यांनी सांगितले सर्वांचे आभार व्यक्त केले चेहर्या विषयी ऑनलाइन लेक्चर देतात आपल्या चेहऱ्यावर कोणती क्रीम लावली पाहिजे किंवा कोणती लावू नये काय इफेक्ट होतात चेहरा कसा सॉफ्ट आणि सुंदर राहील आपण नेहमी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी डोळ्याची कानाची नाकाची कशी काळजी याविषयी अत्यंत परिपूर्ण अशी ऑनलाईन सेक्शनला त्यांनी माहिती दिली आहे जर कोणाला आरोग्य विषयी माहिती हवी असल्यास किंवा आरोग्य बाबत समस्या असल्यास तेजस फिटनेस क्लबच्या संचालिका सौ सुचिता दीपक जाधव त्यांच्याशी संपर्क करावा संपर्क क्रमांक दिला आहे 8591393114 वरील नंबर वर संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले आहे कार्यक्रमात अतिशय छान प्रकारे झाला सर्वांचे खूप आभार व धन्यवाद सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल.
000000



