vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

 श्री सिद्धिविनायक मंदिरात  ‘माघी गणेश जयंती महोत्सवा’ची सुरुवात; गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर भव्य सोहळा..

मुंबई प्रतिनिधी-प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या माघी गणेश जयंतीनिमित्त माघ श्री गणेश जयंती महोत्सवाचं आयोजन केलं आहे. सोमवारपासूनच या महोत्सवाला सुरूवात झाली आहे. 19 जानेवारी ते रविवार, 25जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

या महोत्सवादरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज पहाटे सकाळी 5.00 ते 5.30 दरम्यान काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर महानैवेद्य, नमस्कार, अभिषेक तसेच अन्य विधी पार पडतील. सायंकाळी लोकनृत्य, भजन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यसंगीत अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कलाकारांचे सादरीकरण

सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध तालवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शिवमणी यांचे सादरीकरण होणार आहे. मंगळवारी बासरीवादनाचे ज्येष्ठ कलाकार पंडित राकेश चौरसिया यांची बासरी मैफल होईल. त्याच संध्याकाळी ओडिसी नृत्यप्रकाराचे सादरीकरणही होणार आहे. बुधवारी प्रसिद्ध सतारवादक पंडित निलाद्री कुमार यांचा सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रघुनाथ फडके यांचे गीत रामायण सादरीकरणही होणार आहे.

22 तारखेला भव्य रथ शोभयात्रा,22 जानेवारीला मुख्य माघी गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी त्या दिवशी दुपारी 3.00 वाजता भव्य रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.

शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते विजय घाटे यांचे तबलावादन होईल. तर शनिवारी, 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध तबलावादक पंडित आदित्य कल्याणकर यांचा तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे.

मंदिर प्रशासनाच्या मते, आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाचे उद्दिष्ट भारतीय सांस्कृतिक परंपरा भक्तीने जिवंत ठेवणे आहे. माघी गणेश जयंतीला, श्री सिद्धिविनायक मंदिर पुन्हा एकदा भक्ती, संगीत आणि संस्कृतीचे केंद्र बनेल.

संबंधित पोस्ट

बोधचिन्ह’ स्पर्धेत २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

vishwatmaklokswamivarta