vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज..

 

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज असल्याचे मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांनी कळविले आहे.

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळामार्फत सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. परीक्षेकरिता दक्षता समिती गठीत करण्यात आली असून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी तसेच परीक्षा देताना काय करावे आणि काय करू नये, याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग उपाध्यक्ष तथा सदस्य (सदस्य सचिव) दर्जाअड. धर्मपाल मेश्राम यांचा दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…

सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने ‘ती’ विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार..

vishwatmaklokswamivarta