vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

बारामती पोटनिवडणुक- निमित्ताने आयोजित सांगता सभेला सुप्रिया सुळें यांची हजेरी काय म्हणाला ते पहा…

बारामती पोटनिवडणुक- निमित्ताने आयोजित सांगता सभेला सुप्रिया सुळें यांची हजेरी काय म्हणाला ते पहा…

राज्य प्रतिनिधी-बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सांगता सभेला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत, सुनेत्रा पवारांसाठी विक्रमी मतदान करत विजयी करण्याचं आवाहन . तसंच महाविकास आघाडी सुनेत्रा पवारांनाच मतदान करेल असा शब्द दिला आहे. या संघर्षाच्या काळात संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र येऊन दादाला मनापासून श्रद्धांजली अर्पण करू असे आवाहनही यावेळी त्यांनी केलं

दादा आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही'”हा दिवस आपल्या आयुष्यात येईल असं कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं. मी पुण्याहून बारामतीला आल्यानंतर काठेवाडीला गेले होते, आशाकाकींना भेटले. त्या टीव्ही पाहत होत्या, त्यांच्याशी काय बोलावं, कशासाठी आले आहे हे सांगण्याची हिंमत झाली नाही. या सभेसाठी आल्याचं सांगू शकले नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी अडचणीचे राहिले आहेत. सांगता सभा करताना दादा आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. राज्यातील, जिल्ह्यातील काम असलं की आजही आठवण येते. कामं होत राहतात, पण आयुष्यभर घरातील कर्ता पुरुष, भाऊ नाही याचं दु:ख अंतकरणात आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘तिघे ज्याप्रकारे जबाबदारी पेलवत आहेत ती अभिमानाची बाब'”या सभेसाठी राज्यातील अनेक मंत्री आले आहेत. माझं कर्तव्य आणि येथील लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. हा खूप दु:खाचा कार्यक्रम आहे. वहिनींवर, दोन्ही लेकरांवर मोठी जबाबदारी पडली आहे. पार्थ, जय लहानच आहेत. पण तिघे ज्याप्रकारे जबाबदारी पेलवत आहेत ती आपल्यासाठी अभिमानाची, कौतुकाची बाब आहे,” असं त्यांनी म्हटलं.

मी वहिनींना शब्द देते….'”मी महाविकास आघाडीच्या वतीने सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सगळे सहकारी, पदाधिकारी यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की, महाविकास आघाडातील प्रत्येक कार्यकर्ता, बारामतीमधील मतदार वहिनींच्या पाठीशी निवडणुकीत ताकदीने उभा राहील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

बारामती लवकरच एक रेकॉर्ड करणार -पुढे त्यांनी म्हटलं की, “गेली सहा दशकं बारामतीकर आणि पवार कटुंबांचं वेगळं नातं आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीबाबत दिल्लीत काही चर्चा सुरु होती, त्यावेळी बारामतीचा विशेष उल्लेख झाला. बारामती लवकरच एक रेकॉर्ड करणार आहे. शरद पवारांना सहा दशकं याच बारामतीकरांनी साथ दिली. सर्वात जास्त वेळा निवडून येण्याचा मान बारामतीकरांना मिळणार आहे. 60 वर्ष ही परंपरा सुरु आहे. शरद पवार साहेब 6 दशकं येथे कार्यरत आहेत. त्यानंतर दादांवर मोठी जबाबदारी आली. त्यांनी निष्ठेने 35 वर्षं सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात स्थापित केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला. पण बारामतीकरांनी कधीच पवारांची साथ सोडली नाही. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना, काँग्रेस यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापपासून शब्द आणि शुभेच्छा देण्यास आले”. हा दिवस आणि वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये

“माझी तर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. म्हणून पहिल्या दिवशी बिनविरोध व्हावं असं सांगितलं. काहींचे फॉर्म शिल्लक आहेत हे दुर्देवी आहे. विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. 1 नंबरला वहिनींचं नाव चिन्ह, बटण आहे, ते दाबा. दादाला आदरांजली श्रद्धांजली द्या, वहिनीला साथ द्या. हा दिवस आणि वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये,” असं त्यांनी भावूक होत सांगितलं.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी :बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta