vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत

 मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत…

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं आणि वर्दळीचं स्थानक असलेल्या सीएसएमटी स्थानकावर मोठा अपघात टळला आहे. दोन लोकल येथे आमने सामने आल्या होत्या. मोटरमनने तात्काळ ब्रेक दाबल्याने दोन्ही ट्रेनची धडक टळली आहे. मात्र दोन लोकल समोरासमोर आल्यानंतर स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता.

बदलापूरहून येणारी जलद लोकल चुकीने प्लॅटफॉर्म 5 वर वळवली गेली, जिथे आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ ब्रेक लावले. त्यामुळे संभाव्य टक्कर थोडक्यात टळली.  या घटनेनंतर प्लॅटफॉर्म 8 ते 8 वरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे.

एकाच ट्रॅकवर आल्या दोन लोकल,मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथे एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्या होत्या. बदलापूरहून येणारी एक ट्रेन, दुसरी लोकल उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्म 4 ऐवजी प्लॅटफॉर्म  5 वर नेण्यात आली होती.

वाहतूक पूर्ववत,लोकल ट्रेन्स मागे घेण्यात आल्या असून आता वाहतूक पुन्हा सुरू होत आहे. प्लॅटफॉर्म 5 ते 8 ब्लॉक झाले होते आणि दुपारी 3.18 पासून वाहतूक थांबवण्यात आली होती. आता ट्रेन्स मागे घेण्याचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरू होत आहे.

या दोन लोकल ट्रेन्समध्ये सिग्नल होता. उपनगरीय प्लॅटफॉर्मसाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल लाल (रेड) स्थितीत होता, त्यामुळे मोटारमनने ट्रेन थांबवली. तसेच, दोन्ही ट्रेन्समध्ये 130  मीटरपेक्षा जास्त अंतर होते. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

जि.प. ठाणे अंतर्गत ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन..ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन..

मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

शस्त्र परवाना नुतीनकरण करुन घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक* तंत्रज्ञानाचा वापर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta