vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जि.प. ठाणे अंतर्गत ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन..ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन..

जि.प. ठाणे अंतर्गत ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन..ग्रामसभा व जनजागृती उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन..

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) -भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार दि. 24 एप्रिल, 2025 रोजी संपूर्ण देशभर ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवस (NPRD)’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत 431 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा, तसेच तालुका व जिल्हा स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा स्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:• विशेष ग्रामसभा – ग्रामस्तरावर ग्रामस्थाचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामसभा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.• स्वच्छता उपक्रम – ‘राष्ट्रीय पंचायत राज दिवस (NPRD)’ अंतर्गत community mobilization activity राबविण्यात येणार आहे.• महिला स्नेही ग्रामपंचायत, स्वामित्व, पंचायतींचे स्व – उत्पन्न वाढ, पेसा, वन हक्क कायदा यासारख्या योजनांचे साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.• पुरस्कार वितरण – उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, प्रतिनिधी, संस्था यांचा गौरव.• मा. पंतप्रधान यांचे संदेशाचे थेट प्रसारण https://www.youtube.com/live/yNRBlhlFZkc?si=BbDBBQRDFOB_2KAB या लिंकद्वारे सर्व ठिकाणी दाखवण्यात येणार आहे.   राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा केवळ उत्सव नसून, लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या ग्रामसभेच्या बळकटीकरणाचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकांचा सक्रिय सहभागच ग्रामीण विकासाला खऱ्या अर्थाने गती देतो, त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील गोवंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे सोमवारी (दि.२७) भव्य आयोजनलोककलावंतांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पाचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार…

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती