vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम..

मुंबई, प्रतिनिधी: मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी ३० जुलै २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (Private Practice) करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तयेच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

मा. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, शासन सेवेत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनाच्या धोरणानुसार बांधील असून, त्यांनी पूर्णवेळ शासकीय सेवा बजावणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आह

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकरणात शासनाच्या वतीने सहायक शासकीय अभियोक्ता अतुल काळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच, आरोग्य विभागाचे विधी सल्लागार ॲड. सतीश भेंडेकर यांनी कायदेशीर मुद्द्यांची मांडणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समन्वय साधून शासनाच्या बाजूला परिपूर्ण सहकार्य केले.

कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, शासकीय सेवेतील शिस्त, उत्तरदायित्व आणि रुग्णहिताला प्राधान्य देणारा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

000

संबंधित पोस्ट

हिंदू खाटीक अर्थिक विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन …