vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सायन ब्रिजचे १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन; लवकरच सुरू होणार ब्रिज- सायन–धारावी–कुर्ला वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा..

सायन ब्रिजचे १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन; लवकरच सुरू होणार ब्रिज- सायन–धारावी–कुर्ला वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा..

मुंबई प्रतिनिधी-शीव (SION) रेल्‍वे स्थानकाजवळील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या पुलाच्‍या सर्व बाजूची सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी या उड्डाणूपल प्रकल्‍पाची पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP – 2) अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी व ६ वी) टाकणे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध व्‍हावी म्‍हणून शीव (Sion) स्थानकाजवळील रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी करण्‍याचे काम रेल्वे प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले आहे. तसेच, हा पूल ११२ वर्षे जुना व असुरक्षित ठरविण्यात आल्‍याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले होते.

🔷रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे (Approach Roads) नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. या पूल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च रेल्वे विभागाच्या निधीमधून करण्यात येत आहे. निविदेनुसार या पुलाच्‍या पुनर्बांधणीचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. मात्र, तत्‍पुर्वीच हा पूल सुरू करण्‍याचे निर्देश श्री.अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

छायाचित्र प्रदर्शनातून सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे घडले दर्शन… 

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कराड – चिपळूण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायोजना करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

विशेष लेख :गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर!