vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था

 

        नवी मुंबई प्रतिनिधी    कोपरखैरणे सेक्टर 18 मध्ये प्लॉट क्र. 14 येथील अर्थव सोसायटी मध्ये तिस-या मजल्यावरील रूम नं. 302 चा स्लॅब सायं. 5 वा. दरम्यान कोसळून रूम नं. 202 मध्ये पडलेला आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणास दुखापत झालेली नाही.

          रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत रहिवाश्यांसाठी सेक्टर 5 कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सभागृहामध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली असून इमारतीचा वीजपुरवठा व पाण्याची लाईन खंडीत करण्यात आलेली आहे.

          सदर इमारत रहिवाशांना बाहेर काढून सील करण्यात आलेली असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केलेली आहेत. तरी नागरिकांनी या यादीतील धोकादायक इमारतींमधील तसेच राहण्यास धोकादायक वाटताहेत अशा इमारतींमधील रहिवास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची खबरदारी घेत थांबवावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी…▪ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..