अलिबाग येथील उदया बाजारला पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची सदिच्छा भेट
रायगड-अलिबाग प्रतिनिधी : टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएसआर अंतर्गत २०१९ पासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प उदया अंतर्गत महिला व दिव्यांग व्यक्तीकरिता उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन भारतीय उद्योजकता विकास संस्था (इडीआय) यांचे द्वारा केले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या महिला उद्योजिकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने उदया महिला उद्योजिका असोसिएशनच्या माध्यमातून उदया बाजार आउटलेट स्टोअर्सचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला. या स्टोअर्सला राज्याचे रोजगार हमी ,फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना .भरतशेठ गोगावले यांनी सदिच्छा भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल ,जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त जी. एस. हरळय्या, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे तसेच महिला असोसिएशन च्या पल्लवी जोशी,रजनी पाठक,अश्विनी सकपाळ, इडीआय प्रशिक्षक जॅकी सर,उद्योजक मयूर ठक्कर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत इ डी आय प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले.