vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र” करिता जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करावी

रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र” करिता जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करावी

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत जिल्ह्यात 12 ठिकाणी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र”चे आयोजन करण्यात येत असून याकरिता रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत पां.कोकाटे यांनी केले आहे.
  दि.29 सप्टेंबर, 2026 रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी 500 ठिकाणी रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करुन राज्याच्या रोजगार क्षेत्रात एक नवा अध्याय लिहला जाणार आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे.
     जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मसी पदवीधर व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. तसेच https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिकंद्वारे सुध्दा माहिती भरण्यात यावी.
      “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मध्ये नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील कार्यरत महामंडळ “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मध्ये आपल्या विविध कर्ज योजनासह सहभागी होत आहेत. आपल्याला कर्ज योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन याद्वारे दिले जाईल. जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जिल्ह्यात राबविले जाणारे मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहिती व मार्गदर्शन रोजगार मेळाव्यामध्ये केले जाणार आहे. तसेच “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” मधील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र-रायगड जिल्ह्यातील 12 ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. अंजुमन आय इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस, प्लॉट नं.2&3, सेक्टर 16, ठाणा नाका जवळ, खांदागाव नवीन पनवेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता.माणगाव. आयटीएम कौशल्य विद्यापीठ, प्लॉट नंबर 25&26, औद्योगिक क्षेत्र सेक्टर-4, खारघर, ता.पनवेल. शेठ जे.एन.पालीवाला कला, वाणिज्य, कला आणि विज्ञान महाविद्यालय पाली-सुधागड. यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन महाविद्यालय डॉ.एन.वाय.तासगावकर कॉम्प्लेक्स चंधाई पो.नरसापुर ता.कर्जत. भारतीय एज्युकेशन सोशल/चॅरिटेबल ट्रस्ट मु.वेलशेत, पो.पिगोंडे, ता.रोहा. के.टी.एस.पीएम.बि.एल.पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय सेमिनार हॉल 2 रा माळा, बि.एल.पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय, खोपोली. एम.जी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स 3 रा माळा, एम.जी.एम. एज्युकेशन कॅम्पस, प्लॉट नं. 1&2 सेक्टर 01, कामोठे नवी मुंबई.डॉ.पतंगराव कदम, कला आणि वाणिज्य महाविद्यालय सिव्हिल कोर्ट जवळ पेण. जे. एस. एम. महाविद्यालय महर्षी कर्वे रोड, एसबीआय बँकेच्या मागे, लिमयेवाडी अलिबाग. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 3 रा माळा, हसमुख भवन सिडकोच्या मागे, हिरानंदानी पार्कजवळ, सेक्टर 04, खारघर पनवेल. श्रीमती गीता ङि तटकरे तंत्रनिकेतन महाविद्यालय मु.गोवे, पो.कोलाड, ता.रोहा.
संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी, श्री. राहुल वि.गुल्हाणे, 7020758701 लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे, 9421613757 या यांच्या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनरोजगार महाकुंभ- महाराष्ट्र
राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी. https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
0000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार-बांधकाम कामगारांना शासनाचा आधार- ‘बांधकाम कामगारांचे कल्याण – हक्कांपर्यंत पोहोच’ उपक्रम- बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta