vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कला- क्रीडा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन       

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कला- क्रीडा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजीच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून त्यापूर्वी ज्येष्ठांच्या विविध कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणा-या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्य समारंभात संपन्न होणार आहे.

          विविध स्पर्धांमध्ये कथाकथन, हास्य, वेशभूषा, वैयक्तिक नृत्य व टेलिफोन या स्पर्धा दि. 21 सप्टेंबर रोजी तसेच समुह नाटिका, एकपात्री अभिनय, कराओके वैयक्तिक गायन, वैयक्तिक गायन, काव्यवाचन या स्पर्धा 22 सप्टेंबर रोजी महात्मा फुले भवन, सेक्टर 3, वाशी येथे सकाळी 9.30 ते सायं. 5.30 या वेळेत संपन्न होणार आहेत. या स्पर्धांमधील सहभागासाठी 18 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येतील.

          त्याचप्रमाणे, कॅरम (एकेरी), बुध्दीबळ स्पर्धा दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते सायं. 5.30 या वेळेत महात्मा फुले भवन, सेक्टर 3, वाशी येथे संपन्न होणार आहेत. तसेच ब्रीझ गेम स्पर्धा दि. 23 सप्टेंबर रोजीच सकाळी 9.30 ते सायं. 5.30 या वेळेत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागा गणा पाटील उदयान, से-15, सीबीडी बेलापूर येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धांमधील सहभागासाठी 21 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज दाखल करता येतील.

          याशिवाय ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्येष्ठ नागरिक’ या विषयावरील निबंध 24 सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील तसेच ‘नातवंडास पत्र’ या विषयावर 24 सप्टेंबर पर्यंत सहभाग घेता येईल.

          यासोबतच – दि. 01 ऑक्टोबर 2025 ते दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यत या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांचा ‘शताब्दी सन्मान’ करण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रतिवर्षीप्रमाणे दि.01 ऑक्टोबर 2025 ते दि. 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांचा ‘ज्येष्ठ अमृत सन्मान’ करण्यात येणार आहे. तसेच दि.01 ऑक्टोबर 2025 ते दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यत या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा ‘सुवर्ण बंधन सन्मान’ करण्यात येणार आहे. याकरिता 24 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

           या सर्व स्पर्धा व सन्मान विषयीची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये व उपआयुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर या ठिकाणी शासकीय सुट्या वगळून उपलब्ध होतील तसेच महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित असलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथेही उपलब्ध होतील.

           अधिक माहितीसाठी बेलापूर व नेरूळ विभाग – श्री. दादासाहेब भोसले – 9372106976, वाशी व तुर्भे विभाग – श्रीम. प्रियंका पाटील – 9082311440, कोपरखैरणे व घणसोली विभाग – श्री. सुंदर परदेशी – 9594841666 तसेच ऐरोली व दिघा विभाग – श्री. मिथुन म्हात्रे – 9867231403 यांचेशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

            महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आदराची व आपुलकीची भावना अभिव्यक्त करण्यासाठी महापौर महोदयांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका सातत्यपूर्ण काम करीत असून दि. 01 ऑक्टोबर, 2026 रोजीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मशीद स्फोट प्रकरण- दोन्ही आरोपींविरोधात यु ए पी ए लागू…

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज मागविले३१ जुलै पर्यंत अर्ज सादर करा

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..