vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील शेतकरी, घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि उद्योगांना पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून आवश्यकतेनुसार वाढीव मागणीची गरज लक्षात घेऊन नवीन डीपीआर तयार करावा, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या. जालना जिल्ह्यातील ऊर्जा विभागातील प्रलंबित प्रश्नाचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला. या बैठकीस आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढान, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार नारायण केचे व आमदार संतोष दानवे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून, नियमानुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. कृषी पंपांच्या फीडरवर असलेल्या घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष डिझाइनचे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये बसविण्यात येत आहेत. या व्यवस्थेमुळे कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीजपुरवठा आणि घरगुती ग्राहकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज उपलब्ध राहते. काही ठिकाणी सिंगल फेजिंगसारख्या तांत्रिक अडचणी असल्या तरी त्याचे निराकरण केले जात आहे. तांत्रिक अडचणी विहित कालावधीत न सोडविल्यास यासाठी मुख्य अभियंत्यांना थेट जबाबदार धरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्सफॉर्मरसाठी लागणाऱ्या ऑइलची कोणतीही कमतरता नाही. ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यानंतर त्याची नोंद आणि बदलाची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी १ एप्रिलपासून ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब कमी होऊन शेतकरी आणि वीजग्राहकांना अधिक जलद सेवा देणे शक्य होत आहे. जालना जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याबाबत लोकप्रतिनिधी उपस्थित केलेले प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी यातील तांत्रिक अडचणी त्वरित दूर कराव्यात. ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती संबधित लोकप्रतिनिधींना देण्यात यावी. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी उपस्थीत केलेल्या सब स्टेशन, वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा, गावठाण फिडर, ट्रान्सफॉर्मर बदलणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली

०००००

संबंधित पोस्ट

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

जनगणना 2027′ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण.

आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील 210 केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’