vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन व तंबाखूमुक्त युवा अभियान रॅली अलिबागमध्ये उत्साहात संपन्न

राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन व तंबाखूमुक्त युवा अभियान रॅली अलिबागमध्ये उत्साहात संपन्न

रायगड-अलिबाग प्रतिनिधी :- राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन आणि तंबाखूमुक्त युवा अभियानाच्या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग आणि जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. न्याय हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे तसेच तंबाखूजन्य व्यसनापासून युवा पिढी दूर राहावी, हा दुहेरी संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी प्रास्ताविक करून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना न्यायाच्या उपलब्धतेबाबत जागृती करण्याची गरज अधोरेखित केली. “न्याय हा अधिकार आहे, दान नाही” हा संदेश रॅलीद्वारे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश-३ एस. डी. भगत यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा हा दिवस समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदतीची माहिती देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कायदेशीर साक्षरता वाढणे ही लोकशाही बळकट होण्याची गुरुकिल्ली असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, अलिबाग वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए. डी. पाटील, सचिव अॅड. अमित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी तसेच जे.एस.एम. कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज, दत्ता पाटील लॉ कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथील २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते

 विद्यार्थ्यांनी कायदेविषयक आणि तंबाखूविरोधी घोषणाबाजी करत फलकांच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक माहितीपत्रकेही वाटण्यात आली.

अलिबाग शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीत नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देत “तंबाखूमुक्त युवा”, “तंबाखूमुक्त भारत”, “बेटी बचाव बेटी पढ़ाव”, “बालकामगार बंद करा” असे संदेश देण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

संभाव्य विस्थापित जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 29 मे पर्यंत दरपत्रक मागणी

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार

नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मोठ्या प्रमाणावर राबवा- सीईओ मिन्नू पी.एम.*ग्राम पंचायतींना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta