vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ गीतातून जनजागृतीचा संदेश; उदयनगर येथे CPHC प्रशिक्षण उत्साहात

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ गीतातून जनजागृतीचा संदेश; उदयनगर येथे CPHC प्रशिक्षण उत्साहात

 

बुलढाणा, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उदयनगर (ता. चिखली) येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. प्रशिक्षणादरम्यान अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले “माझे गाव, आरोग्य संपन्न गाव… कसं काय?” हे गीत सहभागी आरोग्य कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले. या गीताच्या माध्यमातून आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

 

कार्यशाळेत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांशी संवाद साधत गावागावात तसेच गृहभेटीदरम्यान या गीताचा वापर करून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. आरोग्य संवर्धन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी या गीताचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

प्रशिक्षणामध्ये मातृ व बाल आरोग्य, असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, संसर्गजन्य रोग नियंत्रण, आरोग्य संवर्धन व जनजागृती, गृहभेटी व उपशामक उपचार सेवा, मानसिक आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य सेवा तसेच समुदाय सहभाग आणि आरोग्य नियोजन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. क्षेत्रीय स्तरावर आरोग्य सेवा अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करण्यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम पार पडला. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल खंडागळे व डॉ. वनिता रिंढे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनिता जवंजाळ आणि सुलोचना पराड यांनी प्रशिक्षक म्हणून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला विविध जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक विकसित होऊन नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

00000

 

संबंधित पोस्ट

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी

राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून सर्व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी! 

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

शहरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनची व्यापक पावले; नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर