vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी हा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘डीजे’मुक्त (DJ) साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.

याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, “गणेशोत्सव हा मूळचा सात्विक, पवित्र आणि आनंददायी असा उत्सव आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या मंगलमय उत्सवाला गालबोट लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः ‘डीजे’च्या माध्यमातून लावली जाणारी अश्लील गाणी, त्यावर होणारी बीभत्स नृत्ये आणि कर्णकर्कश आवाज यांसारख्या विकृती उत्सवात शिरल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे गणेशभक्त आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा व शांततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधन, लोकजागृती आणि हिंदु संघटन या उदात्त हेतूंनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र, सध्या पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे हा मूळ उद्देश कुठेतरी हरवत चालला असून उत्सवाचे स्वरूप विकृत होत आहे. हिंदु जनजागृती समितीने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवातील या ‘डीजे’ संस्कृतीला आणि अन्य अनिष्ट प्रथांना सातत्याने कडाडून विरोध दर्शवला आहे. यावर्षीही अशा अपप्रवृत्तींना आळा बसावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

सद्यस्थितीत एक सकारात्मक बाब म्हणजे, अनेक गणेशोत्सव मंडळे ‘डीजे’मुक्त उत्सव साजरा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. सोलापूरसारख्या शहरात ‘सोलापूर पॅटर्न’ राबवून एक चांगला आदर्श निर्माण करण्यात आला आहे. भाविकांना खऱ्या अर्थाने सात्विक आनंद मिळवून देण्यासाठी, लोकप्रबोधन करण्यासाठी तसेच हिंदु संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासाठी उत्सवामध्ये ‘डीजे’ची अजिबात आवश्यकता नाही. पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि आपल्या वैभवशाली संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा केल्यास त्याला कोणाचाही विरोध असणार नाही.”

त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि आपला गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांच्या साथीने, अत्यंत आनंदाने व परंपरेनुसार ‘डीजे’मुक्त साजरा करावा, असे आवाहन *श्री. सुनील घनवट* , राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती (संपर्क क्र.: ७०२०३८३२६४) यांनी केले

संबंधित पोस्ट

अमरावती शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर· जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र· दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यावर कायमस्वरूपी अन्यायकारक ठरणारा गोदावरी अभ्यास गट 02 मांदांडे समितीच्या अहवालाच्या विरोधात जनजागृती अभियान – डॉ संजय लाखेपाटील

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे