vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

सांगली, प्रतिनिधी : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत 52 व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजनेंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात. या योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादी मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2025 या कॅलेंडर वर्षात (दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

दि. 28 फेब्रुवारी 2026 नंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.तसेच, मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत किंवा समक्ष पाठविण्यात यावी, असे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा- अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ”माझा पैसा माझा अधिकार”- खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे